VJNT Loan Scheme Details 2023 | व्यवसाय करण्यासाठी १ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

 

mazafayda.com

VJNT Loan Scheme Details 2023 | व्यवसाय करण्यासाठी १ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया👇👇👇

VJNT Loan Scheme Details 2023 | वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजना २०२३ : या योजने अंतर्गत विविध व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.या लेखामध्ये आपण वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत.या योजनेतून अनेक लाखो तरुणांनी याचा लाभ घेतलेला आहे.तुम्ही सुद्धा या योजने अंतर्गत कर्ज घेण्यासाठी आर करू पाहताय तर खाली दिलेल्या माहिती वरून जसे कि अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता आणि लागणारे कागदपत्रे पाहून तुम्ही आर करू शकता.


या योजने अंतर्गत विविध ३७ प्रकारच्या व्यवसायासाठी २५०००/- ते १,००,००० पर्यंत कर्ज देण्यात येते.या योजनेचे मूळ उद्देश विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्‍यक्‍तींना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्षम करणे आहे. या कर्ज योजनेसाठी अर्ज करायचे असल्यास खालील माहिती वाचून तुम्ही अर्ज करू शकता.”VJNT Loan Scheme Details 2023

या व्यवसायांसाठी VJNT Loan Scheme उपलब्ध.

 • मत्स्य व्यवसाय 
 • कृषी क्लिनिक 
 • पॉवर टिलर
 • हार्डवेअर व पेंट शॉप
 • सायबर कॅफे
 • संगणक प्रशिक्षण 
 • झेरॉक्स 
 • स्टेशनरी 
 • सलुन 
 • ब्युटी पार्लर 
 • मसाला उद्योग 
 • पापड उद्योग
 • मसाला मिर्ची कांडप उद्योग 
 • वडापाव विक्री केंद्र 
 • भाजी विक्री केंद्र 
 • ऑटोरिक्षा
 • चहा विक्री केंद्र 
 • सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र 
 • डी. टी. पी. वर्क 
 • स्विट मार्ट 
 • ड्राय क्लिनिंग सेंटर 
 • हॉटेल 
 • टायपिंग इन्स्टीटयुट
 • ऑटो रिपेअरींग वर्कशॉप
 • मोबाईल रिपेअरिंग
 • गॅरेज
 • फ्रिज दुरूस्ती
 • ए.सी .दुरुस्ती 
 • चिकन / मटन शॉप
 • इलेक्ट्रिकल शॉप
 • आईस्क्रिम पार्लर व इतर 
 • मासळी विक्री
 • भाजीपाला विक्री 
 • फळ विक्री 
 • किराणा दुकान
 • आठवडी बाजारामध्ये छोटसे दुकान 
 • टेलिफोन बुथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग व इत्यादी

पात्रता  

 • १. अर्जदार विमुक्त जाती/ भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्गातील असावा.
 • २. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
 • ३. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षे असावे.
 • ४. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू. १.०० लाखापेक्षा जास्त नसावे.
 • ५. एका वेळी कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल.
 • ६. शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरूण मुले/मुली यांना प्राधान्य देण्यात येईल.
 • ७. अर्जदाराने आधार कार्ड संलग्न बँक खात्याचा तपशिल सादर करावा.
 • ८. अर्जदार महामंडळाच्या कोणत्याही (केंद्र व राज्य) योजनेचा थकबाकीदार नसावा.

अर्ज करण्याची प्रक्रिया 👇👇👇

 • या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता सर्वप्रथम या संकेतस्थळाला भेट द्या.
 • त्यानंतर वेबसाइटच्या वरील बाजूस नोंदणी ची लिंक दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही नोंदणी करू शकता.नोंदणी करताना तुम्हाला तुमची योग्य माहिती भरून नोंदणी करायची आहे.
 • त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे व माहिती अपलोड करून तुम्ही अर्ज सबमिट करावा.
 • पात्र उमेदवारांची यादी जाहीर होईल व पात्र उमेदवारांना कर्ज वाटप होईल. 
VJNT Loan Scheme Details 2023′

अर्ज भरण्यासाठी 👇👇👇

    👉👉👉click here

Leave a Comment