यवतमाळ येथे कोणत्याही शिक्षणा शिवाय सफाई कर्मचारी पदांची भरती / District Court Yavatmal Bharti 2023

districts.ecourts.gov.in/yavatmal

 

जिल्हा न्यायालय यवतमाळ अंतर्गत रिक्त जागांसाठी भरतीचे आयोजन केले गेले आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसा करता येईल याची माहिती देणार आहोत. या पदा करिता अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, ठिकाण व अर्ज कसा भरायचा याबद्दल सर्व माहिती या पोस्ट मध्ये दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी या भरतीची दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. कोणत्याही प्रकारच्या भरती आणि योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या mazafayda.com

या भरती मध्ये सफाईगार या पदांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता खालील दिलेली आहे. अकोला जिल्ह्यात नोकरीची ठिकाण असणार आहे.

‘यवतमाळ येथे कोणत्याही शिक्षणा शिवाय सफाई कर्मचारी पदांची भरती’

 1. नोकरीचे ठिकाण – यवतमाळ
 2. पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
 3. अर्जाची प्रक्रिया – ऑफलाईन
 4. निवड प्रक्रिया – मुलाखती
 5. अर्जाची शेवटची तारीख – १२ जून २०२३
 6. वयोमर्यादा –
  • उमदेवार १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा.
  • सर्वसाधारण प्रवर्गाकरीता ३८ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा व
  • मागासवर्गीय असल्यास ४३ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.
 7. अर्ज शुल्क –

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच पत्राव्दारे (आर. पी. ए.डी.) किंवा शिघ्र डाक सेवा (स्पीड पोस्ट ) पोचपावतीसह ” सफाईगार पदाकरीता अर्ज” असे लिफाफ्यावर लिहुन प्रबधंक, जिल्हा न्यायालय यवतमाळ (यानंतर ज्यास संक्षिप्तपणे “जिल्हा न्यायालय” असे संदर्भीत केले आहे.) यांच्याकडे दिनांक १२/०६/ २०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत अथवा त्यापुर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत.
 • या तारखेनंतर आलेले अर्ज अथवा इतर मार्गाने पाठवलेले किंवा लिफाफ्यावर “सफाईगार पदाकरीता अर्ज” असे नमुद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. पोस्टाव्दारे झालेला विलंब विचारात घेतला जाणार नाही.
 • अर्जाचा नमुना व सोबतच्या प्रमाणपत्रांचे नमुने जिल्हा न्यायालय, यवतमाळचे संकेतस्थळ https://districts.ecourts.gov.in/yavatmal यावर उपलब्ध आहेत. त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे सादर करावीत.
 • उमेदवाराने अन्य कोणतेही प्रमाणपत्र अथवा प्रमाणपत्रांच्या प्रती अर्जास जोडू नयेत.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुन 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

निवड प्रक्रिया

 • सफाईगार पदासाठी अल्पसुचीत नमुद उमेदवारांची २० गुणांची चाफल्य व साफसफाई कामाचे मूल्यमापन परिक्षा घेण्यात येईल.
 • सफाईगार पदासाठी चाफल्य व साफसफाई कामाचे मुल्यमापन परिक्षेतील गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची २० गुणांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल.
 • उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करीता, परिक्षा व मुलाखतीस बोलविल्यास स्व:खर्चाने हजर राहावे लागेल.
 • सफाईगार पदासाठी २० गुणांसाठी चाफल्य व साफसफाई परिक्षा घेण्याची तारीख जिल्हा न्यायालयाचे सुचना फलकावर व https:// districts. ecourts. gov.in/ yavatmal या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
 • सफाईगार पदासाठी तोंडी मुलाखती करीता पात्र झालेल्या उमेदवारांची यादी व मुलाखतीचे वेळापत्रक जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथील सुचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.

महत्वाची कागदपत्र

 • “नोंदणी क्रमांक ” हा अर्जातील रकाना कार्यालयाव्दारे भरण्यात येईल.
 • अर्जाचा नमुना जिल्हा न्यायालय, यवतमाळ यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याप्रमाणेच असावा.
 • ओळखपत्र असल्याशिवाय चाफल्य परिक्षा व मुलाखतीस हजर राहण्यास परवानगी मिळणार नाही.
 • उमेदवाराने स्वत:चा पुर्ण पत्ता पिनकोडसह व भ्रमणध्वनी (असल्यास) लिहीलेला व रु.२५/- चे पोस्टाचे तिकीट चिटकवलेला लिफाफा स्वत:चा पत्ता लिहीलेला आर. पी. ए. डी. च्या पोहोच पावतीसह अर्जासोबत जोडावा.

ऑनलाईन अर्ज आणि जाहिरात

Leave a Comment